जागतिक महिला दिनानिमित्त दि. ०८ मार्च, २०२६ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका परिवहन सेवेत महिलांना मोफत प्रवास…. - All India News Mulani . online

All India News Mulani . online

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Sunday, March 8, 2026

जागतिक महिला दिनानिमित्त दि. ०८ मार्च, २०२६ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका परिवहन सेवेत महिलांना मोफत प्रवास….

दि.०७/०३/२०२६ वार रविवार (मुख्य संपादक -नजीर मुलाणी, वसई) मो.नं.8796706999

(नजीर मुलाणी, वसई)

जागतिक महिला दिनानिमित्त दि. ०८ मार्च, २०२६ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका परिवहन सेवेत महिलांना मोफत प्रवास…

रविवार, दि.०८ मार्च, २०२६ रोजी *जागतिक महिला दिन* साजरा होत आहे. महिलांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, महिला सक्षमीकरण आणि समानतेचे समर्थन करण्यासाठी सर्व एकत्र येतात. समाज, राजकारण, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीमध्ये महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकणाऱ्या रॅली, मोर्चे, परिषदा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. यादिवशी महिलांसाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. राजकारणापासून विज्ञान, कला, संस्कृती आणि इतरही विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. तसेच महिला दैनंदिन जीवनात स्वतःच्या परिवाराचे पालन पोषण करण्याकरिता पुरुषांच्या बरोबरीने काम करीत असतात. 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन सर्व महिलांना प्रोत्साहन देणे कामी मा.महापौर श्री.अजीव पाटील व मा.उप-महापौर श्री.मार्शल लोपीस तसेच मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी महिलांना *दि. ०८ मार्च, २०२६* रोजी वसई विरार शहर महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमध्ये *मोफत बस प्रवास* देण्याबाबत निर्णय घेतलेला आहे.
     याव्दारे सर्व महिलांना आवाहन करण्यात येते की, जागतिक महिला दिनानिमित्त दि. ०८ मार्च, २०२६ रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील मोफत बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा.

No comments:

Post a Comment

Thanks for your