( मुलाणी, वसई )
कामणमध्ये मनसेतर्फे शिवजयंती उत्सव जल्लोषात; मोफत आरोग्य शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वसई ,कामण:-२०० पेक्षा अधिक नागरिकांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ –मान. श्री.अविनाश (दादा) जाधव, मान. श्री.नगरसेवक प्रफुल पाटील व मान. श्री.जयेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत भव्य पालखी मिरवणूक
कामण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल २०० पेक्षा अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिरामध्ये नागरिकांची विविध आजारांची तपासणी करून त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व आवश्यक औषधोपचार देण्यात आले. मनसेच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी विशेष कौतुक केले.
सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष मान. श्री. अविनाश (दादा) जाधव साहेब, नगरसेवक श्री. प्रफुल पाटील साहेब तसेच लोकसभा अध्यक्ष श्री. जयेंद्र पाटील साहेब यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला. त्यांच्या उपस्थितीमुळे युवा कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला.
ढोल-ताशांचा गजर, भगवे झेंडे आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय”च्या जयघोषाने संपूर्ण कामण परिसर शिवमय झाला. या कार्यक्रमाला मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
(शुभेच्छुक – नजीर मुलाणी, मीडिया प्रमुख मनसे / ऑल इंडिया रिपोर्टर)
वसई मधील विविध महत्त्वपूर्ण प्रश्न, समस्या व विविध विषयाला घेऊन अधिवेशन काळात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी *गुरुवार दिनांक १२ मार्च रोजी वसई तहसीलदार कार्यालय समोर* धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
वरील सर्व प्रश्न आपल्या सर्वांशी निगडित आहेत. कृपया वेळ काढून सदर धरणे कार्यक्रम मध्ये सहभागी होणे.
धन्यवाद
वसई विरार जनशक्ती आघाडी
No comments:
Post a Comment
Thanks for your