वालीव नवजीवन रोडवर उघड्यावर मच्छी विक्री; झुरळनाशक फवारताना व्हिडिओ व्हायरल, मनसे नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांची तात्काळ कारवाई - All India News Mulani . online

All India News Mulani . online

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Saturday, March 14, 2026

वालीव नवजीवन रोडवर उघड्यावर मच्छी विक्री; झुरळनाशक फवारताना व्हिडिओ व्हायरल, मनसे नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांची तात्काळ कारवाई

दिनांक 14 मार्च 2026 वार शनिवार (मुख्य संपादक -नजीर मुलाणी ,वसई)
वसई, (नजीर मुलाणी)- वालीव नवजीवन रोडवर उघड्यावर मच्छी विक्री; झुरळनाशक फवारताना व्हिडिओ व्हायरल, मनसे नगरसेवक श्री. प्रफुल्ल पाटील यांची तात्काळ कारवाई
वसई : वसईतील वालीव नवजीवन रोड परिसरात रस्त्याच्या कडेला मच्छी विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याने ग्राहकांसमोरच झुरळ मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी स्प्रे फवारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
व्हिडिओ पाहताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक मान.श्री.प्रफुल्ल पाटील यांनी तात्काळ दखल घेत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रकारांना अजिबात सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी बोलताना नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले की, वसई-विरार परिसरात काही ठिकाणी मच्छी, बकऱ्याचे मटण आणि चिकन उघड्यावर विक्री केली जाते. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमधून निघणारा धूर, धूळ आणि कार्बन या अन्नावर बसण्याची शक्यता असते, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे उघड्यावर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर महानगरपालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
श्री.प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले की, “मी केवळ नगरसेवक नाही तर जनतेचा सेवक आहे. पद असो किंवा नसो, मी नेहमी जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. नागरिकांनी कोणतीही समस्या असल्यास माझ्या कार्यालयात किंवा मोबाईलवर संपर्क साधावा. त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मी प्रयत्न करेन.”
वालीव परिसरात रस्ते, गटार, पाणीपुरवठा, लाईट व स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी आपण सातत्याने काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्थानिक नागरिकांनीही प्रफुल्ल पाटील यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून दिले असल्याचे सांगितले. नागरिकांच्या समस्यांसाठी ते दिवस-रात्र काम करत असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले.
======================================

No comments:

Post a Comment

Thanks for your