(मुलाणी,खुटबाव )
लोणंद :- आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सुजन फाउंडेशन व सुजन संस्था मित्र परिवार समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “सावित्री कर्तबगार महिला सन्मान पुरस्कार २०२६” या कार्यक्रमात सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पत्रकार माधुरी भोसले-सावंत यांचा सन्मान करण्यात आला.लोणंद येथील अमृता मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वंशज नीताताई होले उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते माधुरी भोसले-सावंत यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महिला दिनाच्या निमित्ताने महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या त्यांच्या वंशजांच्या हस्ते हा सन्मान मिळाल्याने अभिमान वाटत असल्याची भावना माधुरी भोसले-सावंत यांनी व्यक्त केली.माधुरी भोसले-सावंत या पत्रकारितेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. त्या वावरहिरे येथील मैत्रेय फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, ग्रामस्वच्छता अभियान, सामाजिक जनजागृती, शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, महिलांसाठी मार्गदर्शन व प्रबोधन, मानसिक आरोग्य तसेच मोबाईलच्या अति वापराबाबत जनजागृती असे विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. सामाजिक प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठवत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मांडण्याचे काम त्या करत आहेत.या कार्यक्रमास नीताताई होले (अध्यक्ष, महिला फुले वंशज, पुणे), चित्राताई क्षीरसागर, शितल शेंळके-पाटील (संस्थापक अध्यक्ष, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हरिकृष्णी महिला ग्रुप, लोणंद), अजित जाधव (अध्यक्ष, सुजन फाउंडेशन), योगेश सावंत, विद्या शिंदे (योगशिक्षिका, फलटण), अर्चना गडहिंग्लजकर (शिरवळ), रजनी शिंदे, नजमा पठाण, डॉ. दिपाली क्षीरसागर, डॉ. जयश्री यादव, अश्विनी जाधव, सुनीता जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अजित जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन रघुनाथ शेळके यांनी मानले.या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा गौरव करण्यात आला. महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा आदर्श घेऊन महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रात पुढे यावे, असा संदेश उपस्थित मान्यवरांनी दिला.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
No comments:
Post a Comment
Thanks for your