दिनांक 16 मार्च 2026 वार सोमवार (मुख्य संपादक- नजीर मुलाणी )
( नजीर मुलाणी, खुटबाव)
नातेपुते : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत नातेपुते परिसरातील खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अवघ्या २४ तासांत अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांच्या या धाडसी आणि जलद कारवाईची परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १४ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास नातेपुते परिसरातील पर्वतेश्वर माळ येथे विजय डोंग्या भोसले (वय ३५) यांचा त्यांच्या पत्नी कांति विजय भोसले यांच्यासोबत वाद झाला. या वादा दरम्यान बारामती येथील बी.या. काळे या आरोपीसह इतरांनी हस्तक्षेप करत वाद उग्र झाला.यानंतर आरोपींनी विजय भोसले यांच्यावर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात विजय भोसले गंभीर जखमी झाले. उपचारासाठी नेले असता त्यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर नातेपुते पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वालके आणि पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने फरार आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. अखेर पोलिसांनी सापळा रचून सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर परिसरातून मुख्य आरोपीला अटक केली. ही संपूर्ण कारवाई अवघ्या २४ तासांत पूर्ण करण्यात पोलिसांना यश आले.या कारवाईत नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विशाल वायकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईचे परिसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे
::::::::::::;::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
No comments:
Post a Comment
Thanks for your