(मुलाणी, वसई)
विरार - जिल्हा परिषद पालघर अंतर्गत उमेद अभियान आणि वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने “कोकण सरस” महोत्सव या महिला बचत गटांमार्फत तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे, हस्तकलेचे, कलाकुसरीचे व स्वादिष्ट पदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन दिनांक १२ मार्च ते १६ मार्च २०२६ या कालावधीत म्हाडा मैदान (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स), जकात नाका, विरार (पश्चिम) येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या आयोजना बाबत दि.०९ मार्च २०२६ रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदर पत्रकार परिषदेवेळी मा.स्थायी समिती सभापती श्री.प्रवीण शेट्टी, मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी(भा.प्र.से.), मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर श्री.मनोज रानडे, सर्व स्थायी समिती सदस्य, अतिरिक्त आयुक्त श्री.संजय हेरवाडे, परिवहन व्यवस्थापक श्री.धैर्यशील जाधव, पत्रकार, जिल्हा परिषद पालघर व महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर पत्रकार परिषदेत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर श्री.मनोज रानडे यांनी “कोकण सरस” महोत्सवाच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत सादर केली. या उपक्रमाद्वारे महिला बचत गटांमार्फत तयार करण्यात येणाऱ्या विविध वस्तूंना, पदार्थांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून त्यांच्या कष्टाला सन्मान मिळून देणे व त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा मुख्य उद्देश असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवास भेट देऊन तेथील विविध आकर्षक वस्तूंची, खाद्यपदार्थांची खरेदी करून महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन यावेळी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मनोज रानडे यांनी केली. पत्रकार परिषदेत बोलताना मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी(भा.प्र.से.) यांनी “कोकण सरस” महोत्सवाची जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याचे आवाहन सर्व पत्रकारांना तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींना केले. वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या “कोकण सरस” महोत्सवात महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री केले जाणार असून शहरातील सर्व नागरिकांनी आवर्जून या महोत्सवास भेट द्यावी असे आवाहन यावेळी मा.आयुक्त महोदयांनी केले. यावेळी मा.स्थायी समिती सभापती श्री.प्रवीण शेट्टी यांनीही या महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगून लोकप्रतिनिधींमार्फत याची जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात यावी व महिला बचत गटांनी तयार केलेल्या स्थानिक उत्पादनांना नवीन ओळख निर्माण करून देणेसाठी सर्व नागरिकांनी या महोत्सवास अवश्य भेट द्यावी असे आवाहन केले. जिल्हा परिषद पालघर अंतर्गत उमेद अभियान आणि वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने “कोकण सरस” महोत्सव या महिला बचत गटांमार्फत तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे, हस्तकलेचे, कलाकुसरीचे व स्वादिष्ट पदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन दिनांक १२ मार्च ते १६ मार्च २०२६ या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत म्हाडा मैदान (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स), जकात नाका, विरार (पश्चिम) येथे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment
Thanks for your