वसई-विरार महानगरपालिकेत “सफाई मित्र” ॲपचे उद्घाटन - All India News Mulani . online

All India News Mulani . online

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Wednesday, March 11, 2026

वसई-विरार महानगरपालिकेत “सफाई मित्र” ॲपचे उद्घाटन

दिनांक 11 /3 /2026 वार बुधवार (मुख्य संपादक -नजीर मुलाणी, वसई )मो.नं.8796706999
 (मुलाणी ,वसई)
वसई-विरार : वसई-विरार शहरातील स्वच्छतेसंदर्भातील नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या “सफाई मित्र” ॲपचे उद्घाटन मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात महापौर अजीव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेसंदर्भातील तक्रारी थेट प्रशासनाकडे नोंदविता येणार आहेत. नागरिकांनी अॅपद्वारे कचरा, अस्वच्छता किंवा इतर स्वच्छतेच्या समस्यांचे फोटो अपलोड केल्यास संबंधित विभागाला त्वरित माहिती मिळून २४ तासांच्या आत त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे.यावेळी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी सांगितले की, कोणताही नागरिक आपल्या अँड्रॉईड मोबाईलवर हे अॅप डाउनलोड करून स्वच्छतेबाबत तक्रार नोंदवू शकतो. तसेच वेब पोर्टलच्या माध्यमातूनही तक्रारी नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. या प्रणालीमुळे शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या तक्रारींचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक व प्रभावीपणे करता येणार आहे.महापौर अजीव पाटील यांनी सांगितले की, स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती एक लोकचळवळ बनली पाहिजे. “सफाई मित्र” अॅपच्या माध्यमातून नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद निर्माण होईल, असे त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमाला उपमहापौर मार्शल लोपीस, स्थायी समिती सभापती प्रविण शेट्टी, सभागृह नेते प्रफुल्ल साने, विरोधी पक्षनेते मनोज पाटील, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त दिपक सावंत, तसेच नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::;:::::;;::;;:::::::::::::::::::::

No comments:

Post a Comment

Thanks for your