शिंगणापूरमध्ये बेवारस मानवी कवटी आढळली; दहिवडी पोलिसांकडून तपास सुरू - All India News Mulani . online

All India News Mulani . online

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Thursday, April 23, 2026

शिंगणापूरमध्ये बेवारस मानवी कवटी आढळली; दहिवडी पोलिसांकडून तपास सुरू

दिनांक 23 एप्रिल 2026 वार गुरुवार ( मुख्य संपादक नजीर मुलाणी )
मुलाणी ,खुटबाव
 शिंगणापूर:-माण तालुक्यातील शिंगणापूर येथे जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस बेवारस अवस्थेत मानवी कवटी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजण्यापूर्वी शिंगणापूर (ता. माण, जि. सातारा) गावाच्या हद्दीत बळीप वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे एक मानवी कवटी बेवारस अवस्थेत आढळून आली. सदर बाबीची माहिती पोलीस पाटील संतोष शिवाजी बोराटे (वय 34, रा. शिंगणापूर) यांनी पोलिसांना दिली.आढळून आलेल्या कवटीवर त्वचा, केस, डोळे, कान व नाक यांसारखे अवयव नसून कवटीच्या शेजारी काळ्या रंगाचे केस पडलेले असल्याचे प्राथमिक वर्णनात नमूद करण्यात आले आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 वर्षे असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात रजिस्टर क्रमांक 20/2026, बी.एन.एस.एस. कलम 194 प्रमाणे करण्यात आली आहे. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनासाठी पुढील कार्यवाहीची तजवीज करण्यात आली आहे.सदर प्रकरणाचा तपास WPSI मोटेऔ दहिवडी पोलीस ठाणे मोबाईल नंबर 80 87339547 हे करीत असून, तसेच दाखल करणारे अधिकारी रामचंद्र गाढवे HC/ 1988 दहिवडी पोलीस ठाणे मोबाईल क्रमांक 8108580088,मिळालेल्या माहितीच्या आधारे कवटीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी नागरिकांना याबाबत कोणतीही माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
--------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Thanks for your